चोपडा शहरात खड्डेमय रस्त्यांमुळे कोणाचा जीव जाण्याआधी प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी संतप्त नागरिकांची मागणी
चोपडा - शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
पाऊस आला तर त्या खड्ड्यात पाणी भरलं... तर त्याचा अंदाज नागरिकांना येत नाही आहे.
शहरातील प्रत्येक रस्ता हा खड्ड्यांमुळे खचला आहे.
या खड्डेमय रस्त्यांमुळे " प्रशासन कुणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
कोणाच्या जीव जाण्याच्या आधी शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
सत्ताधारी व विरोधक यांनी नागरिकांचा विचार न करता रस्त्याबद्दल आवाज उठवला नाही, " तर,
चोपडा शहरातील नागरिक एवढे संयमी आहेत की, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार दिला गेला पाहिजे ! ,
अशा देखील खोचक प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
चोपडा शहरातील रस्त्यांची ही दुरावस्था आहे तर कॉलनी व नगर परिसराची तर विचारायची आवश्यकता नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात देखील होताना दिसतात.
परंतु नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी केली आहे.
@चोपडा