साकळी ता.यावल - गोंडगाव ता.भडगाव येथील कु. कै. कल्याणी संजय पाटील या बालिके सोबत अमानुष कृत्य करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार, यावल यांना यावल तालुक्यातील सखल मराठा समाज व सर्वधर्मीयांच्या वतीने निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी यावल येथील खरेदी विक्री संघ येथे दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता सर्वांनी हजर राहावे.
येथून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा चे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोबत लहान बालिकेला आणावे.
या बालिकांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.