साकळी ता.यावल - गोंडगाव ता.भडगाव येथील कु. कै. कल्याणी संजय पाटील या बालिके सोबत अमानुष कृत्य करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार, यावल यांना यावल तालुक्यातील सखल मराठा समाज व सर्वधर्मीयांच्या वतीने निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी यावल येथील खरेदी विक्री संघ येथे दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता सर्वांनी हजर राहावे. येथून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा चे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोबत लहान बालिकेला आणावे. या बालिकांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
साकळी ता.यावल येथील रहिवासी असलेले शारदा विद्या मंदिर प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य वसंतराव रामजी महाजन वय ७२ यांचे आज दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. साकळी दहिगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा साकळीच्या माजी प्रथम महिला सरपंच विद्याताई महाजन यांचे पती तर प्रगतिशील शेतकरी जितेंद्र महाजन, राज्याच्या शिक्षण विभागाचे अव्वर सचिव तुषार महाजन व साकळी नूतन विकास सोसायटीचे संचालक श्याम महाजन यांचे वडील होत. व स्व.वसंतराव महाजन हे साकळी दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद होते. तसेच त्यांनी साकळी ग्रामपंचायतीची सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच राजकीय व सार्वजनिक जीवनात काम करतांना राज्यभरात मोठा जनसंपर्क होता. तसेच गावातील विविध पदे सांभाळताना गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.